Agriculture Land New Rule Update : राज्यात सरकारी, देवस्थान, वतन, वनविभाग, गायरान आणि पुनर्वसनासाठी दिलेल्या अशा वर्ग 2 जमिनींची खरेदी-विक्री विनापरवानगी होणे आता शक्य राहणार नाही.
जमीन खरेदी-विक्रीच्या नियमांत बदल! नवीन नियम लागू
जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे
राज्यात सरकारी, देवस्थान, वतन, वनविभाग, गायरान आणि पुनर्वसनासाठी दिलेल्या अशा वर्ग 2 जमिनींची खरेदी-विक्री विनापरवानगी होणे आता शक्य राहणार नाही. महाराष्ट्र सरकारने नोंदणी कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करत दुय्यम निबंधकांना अशा व्यवहारांना थेट नकार देण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे बनावट परवानग्यांवर आधारित, बेकायदेशीर जमिनी व्यवहारांवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळणार आहे.
जमीन खरेदी-विक्रीच्या नियमांत बदल! नवीन नियम लागू
जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे
दुय्यम निबंधकांना आता काय अधिकार आहेत?
जर पक्षकारांनी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी सादर केली नसेल,तर दुय्यम निबंधक दस्त नोंदणी थेट नाकारू शकतो. अशा व्यवहारांसाठी आधीच्या प्रमाणे नोटीस/सूचना देण्याऐवजी थेट कारवाई केली जाईल. 7/12 उताऱ्यावर, मिळकत पत्रिकेवर किंवा सरकारी आदेशावर “जमिनीवर बंदी” किंवा “प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक” असा स्पष्ट उल्लेख असल्यास, त्याला प्राधान्य दिलं जाईल.