लहान मुलाने चालत्या लिफ्टमध्ये केला धक्कादायक प्रकार, VIDEO पाहून सांगा याला जबाबदार कोण June 11, 2025 by akshay1137 Lift boy viral video सोशल मीडियावर सध्या लहान मुलांचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आजकालची मुलं सोशल मीडियावरील ट्रेंड्सनुसार वागताना आणि बोलताना दिसतात. त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची, काहीतरी वेगळं करण्याची खूप उत्सुकता असते. अनेकदा पालक आसपास नसताना ती मनात येईल ते करतात, अगदी धोकादायक स्टंट्स करण्यापासूनही मागे हटत नाहीत, ज्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता असते. वायरल झालेला झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाने चांगलाच ‘प्रताप’ केलेला दिसतोय. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक लहान मुलगा लिफ्टमध्ये जातो आणि बटण दाबतो. लिफ्ट सुरू झाल्यावर तो चक्क चालत्या लिफ्टचा दरवाजा उघडतो. वायरल झालेला झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा लिफ्ट सुरू असताना तो मुलगा ताकद लावून दरवाजा उघडताना दिसतो. दरवाजा उघडताच लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्ये थांबते आणि हे पाहून तो मुलगा लगेच दरवाजा बंद करतो. त्यानंतर तो लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे पाहू लागतो. हा व्हिडीओ @sattepesatta.official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्याला १ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. “लहान मुलाने चक्क चालत्या लिफ्टचा दरवाजा उघडला. सीसीटीव्हीमध्ये घटना कैद” अशी कॅप्शन या व्हायरल व्हिडीओला देण्यात आली आहे. मात्र, हा व्हिडीओ कुठला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.