Ladki bahin Yojana May 2025 Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे 2025 चा हप्ता कधी मिळणार याची राज्यातील महिलांना आतुरता लागलेली आहे. त्यांना १५०० रुपये कधी मिळणार, असा प्रश्न अनेक महिला विचारत आहेत. याबाबत लवकरच सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वतः ३.३७ कोटी रुपयांच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. याच निधीतून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याने, लवकरच महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा आहे.
लाभार्थी यादी जाहीर यादीत नाव पाहण्यासाठी
लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील अनेक महिन्यांचे हप्ते शेवटच्या आठवड्यात जमा झाले आहेत. त्यामुळे या महिन्याचा, म्हणजेच मे महिन्याचा हप्ता देखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मे महिना संपायला काहीच दिवस उरले असल्यामुळे १५०० रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे.
लाभार्थी यादी जाहीर यादीत नाव पाहण्यासाठी
जर तुम्हाला या महिन्यात योजनेचे पैसे मिळाले नाहीत, तर ते पुढील महिन्यात जमा केले जाऊ शकतात. जर या महिन्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत, तर पुढील महिन्यात त्यांच्या खात्यात एकत्रित ३००० रुपये जमा होतील.
लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या अर्जांची पडताळणी पुन्हा सुरू झाली आहे. ज्या महिलांनी योजनेच्या निकषांविरुद्ध अर्ज केले आहेत असे अर्ज बाद केले जाणार आहेत. या योजनेच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठीच ही पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यात अनेक महिला अर्जदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
लाभार्थी यादी जाहीर यादीत नाव पाहण्यासाठी
मे महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यात महिलांच्या खात्यात एकत्रितपणे ३००० रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पंधराशे रुपयांचा हप्ता वेळेवर जमा करण्यात आला आहे. मात्र, या महिन्यात अजूनही पैसे न आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
लाभार्थी यादी जाहीर यादीत नाव पाहण्यासाठी
मे आणि जून महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही Ladki bahin Yojana May 2025 Installment अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मे महिन्याच्या हप्त्याबद्दल अद्याप कोणतीही घोषणा न झाल्यामुळे, हा हप्ता पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील महिन्यात वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे.